
खेड तालुक्यातील धामणदेवीतील ग्रामस्थांचा स्वतंत्र महसूली गावाला विरोध.
गेल्या काही वर्षापासून खेड तालुक्यातील धामणदेवीच्या डांगरमाथ्यावरील वाड्यांकडून स्वतंत्र महसूली गावाची मागणी केली जात आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर धामणदेवीतील मंदिरात सोमवारी ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत साईनगर, बेलवाडी, पिरमाळ, एमआयडीसी कॉलनी येथील ग्रामस्थांनी सर्वंकश विकासकामासाठी स्वतंत्र महसूली गाव करण्यासाठी मागणी केली. मात्र आपला गाव एकसंघ राहावा, अशी अपेक्षा बहुतांशी ग्रामस्थांनी व्यक्त करीत स्वतंत्र महसूली गावाच्या मागणीचा ठराव फेटाळ्यात आला.www.konkantoday.com