
चैतन्य मुरकर देवदूत ठरला ,मुचकुंदी नदीत वाहून जाणाऱ्या हाेडीवाल्याला वाचविले
(आनंद पेडणेकर)कोंकणात अतिवृष्टीमुळे सगळीकडे पुर आलेले आहेत.ठिकठिकाणच्या नद्यांना पूर आले आहेत मुचकुंदी नदीला आलेल्या पुरामध्ये शेळवीवाडी (हर्चे) येथील रहिवासी तसेच शेळवीवाडी ते बेनगी असे होडीतून प्रवासी वाहतूक करतात, काल संध्याकाळी नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाली, आणि प्रवाहाने रुद्ररूप धारण केले.त्यात . संतोष मयेकर वय वर्ष ५०, ही हाेडी चालक आपली होडी प्रवाहाने उधवस्त झालेल्या जेटीला बांधून घरी परतत असतानाच अचानक पाण्याच्या प्रवाहाचा मोठा लोंढ आल्यामुळे त्याचा तोल गेला आणि ते प्रवाहाबरोबर वाहू लागले. त्याची मदतीसाठी ओरडणे ऐकून वाडीतील तरुण . चैतन्य रमेश मुरकर वय वर्ष २८ याने धोक्याचा मागचा पुढचा विचार न करता वेगाने वाहणाऱ्या नदी पात्रात उडी घेतली मयेकर यांना वाचवण्यासाठी चैतन्यने आटोकाट प्रयत्न केले जवळ-जवळ अर्धा पाऊण तासाच्या अथक प्रयत्नांनी मयेकर यांना वाचवून नदीकिनारी घेऊन आला. चैतन्य यांने दाखविलेल्या धाडसाबद्दल व हाेडी चालक मयेकर यांचा जीव वाचविल्या बद्दल चैतन्य याचे संपूर्ण हर्चे गावात कौतुक होत आहे.
www.konkantoday.com