
स्थापना दिनानिमित्त भाजपाच्या वतीने रत्नागिरी शहरात विविध समाजोपयोगी उपक्रम.
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) स्थापना दिनानिमित्त भाजपच्या वतीने रविवारी शहरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. यानिमित्त भाजपच्या कार्यालयात सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले होते.

सकाळी ९ वाजता ॲड. बाबासाहेब परुळेकर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.



त्यानंतर साडेनऊ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, प्रमोद रेडीज यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. त्यानंतर श्री राम नवमीमिनत्त श्रीराम मंदिरात येणाऱ्या भाविकांना कलिंगड वाटप करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित केलेल्या सत्यनारायण पूजेला बसण्याचा मान ज्येष्ठ कार्यकर्ते सौ. व श्री. उमेश खंडकर यांना मिळाला. सायंकाळी महिलांचा भजनाचा कार्यक्रम झाला.


दुपारी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व भाजप कार्यालयातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषीकेश केळकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धाय मयेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय पेडणेकर, परशुराम उर्फ दादा ढेकणे, उमेश खंडकर, बाबासाहेब परुळेकर, विक्रम जैन, राजू भाटलेकर, मंदार भोळे, मंदार खंडकर, संदीप सुर्वे, सौ. शिल्पा मराठे, नीलेश आखाडे, प्रमोद खेडेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


