
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे युवतीच्या अंगावर ‘खाजकुवल्या’ टाकणारा युवक पोलिसांच्या जाळ्यात
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे युवतीच्या अंगावर खाजकुवल्या टाकून पळून गेल्याप्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विनायक स्वप्नील उर्फ ज्ञानेश्वर धुरी (वय 30) रा. वायरी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. धुरी याला पोलीसांनी अटक केली असून मालवण न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.दरम्यान घटनास्थळी संशयीताची दुचाकी आणि चप्पलही सापडून आल्याचे बोलले जात होते. यापुर्वीही घटना मालवणात घडल्या आहेत. काही जण युवतींच्या अंगावर खाज येणारी पावडर टाकून त्यांचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पोलिसांनी या घटनांची दखल घ्यावी अशी मागणी होत होती. मालवण तालुक्यात यापुर्वी युवतींना त्रास देण्याच्या काही घटना समोर आल्या होत्या.