
श्री झरीविनायक मंदिर, भाट्ये, कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न
आज भाट्ये, रत्नागिरी येथे जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पावन हस्ते श्री झरीविनायक मंदिराचा भव्य कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला.



या दिव्य आणि मंगल सोहळ्याला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून झरीविनायकाचे पूजन व दर्शन घेतले. भक्तिभावाने भरलेले वातावरण, मंत्रोच्चारांचा गजर आणि अध्यात्मिक ऊर्जा याने परिसर भारावून गेला होता.याप्रसंगी माजी आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उदय बने, जयसिंग घोसाळे, रोशन फाळके यांसह मोठ्या संख्येने रत्नागिरीकर तसेच भाविक उपस्थित होते.

