
शिवसेना ठाकरे पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकर ेयांच्या आदेशाने ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याचसोबत इतर सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी देखील सोपविण्यात आली आहे. शिवसेना पक्ष फुटीनंतर पक्षाची बाजू अधिक भक्कमपणे मांडण्यासाठी या नियुक्त्या केल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना ठाकरे गटातील मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणेच सर्व शिवसेना नेते पक्षाची भूमिका वेळोवेळी मांडत असतात. संजय राऊत यांच्यासह शिवसेना नेते अनिल परब, शिवसेना उपनेता प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना उपनेता सुषमा अंधारे आणि आनंद दुबे यांच्याकडे देखील प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.उद्धव ठाकरे गटाने जयश्री शेळके यांच्यावर देखील शिवसेना प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविली आहे.