
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी यांच्या वतीने मुंबई विद्यापीठ उपकेंद्र रत्नागिरी येथे अवयव दान जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला….
आज मुंबई विद्यापीठ उपकेंद्र रत्नागिरी येथे अवयव दान, नेत्रदान, देहदान याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे समाजसेवा अधिक्षक श्री. रेशम जाधव यांनी मुंबई विद्यापीठ उपकेंद्रातील अधिकारी,कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी तसेच स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्रातील उमेदवार यांना अवयवदान, देहदान चे महत्त्व सांगितले तसेच अवयवदान,नेत्रदान, देहदान याबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज, अवयवदान, देहदान करण्यासाठीची प्रकिया याबाबत सविस्तर माहिती दिली.सदर कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठ उपकेंद्र रत्नागिरी चे उपकुल सचिव श्री.अभिनंदन बोरगावे, सहयोगी प्राध्यापक डॉ. पी.वाय.पाटील,उपकेंद्रातील कर्मचारी व विद्यार्थी/विद्यार्थिनी, तसेच स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्राचे उमेदवार यांच्या उपस्थितीत पार पडला.