
मा.आ.रवींद्रजी चव्हाण भा.ज.पा प्रदेश कार्याध्यक्ष यांनी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या वास्तू निर्माण कार्याची केली आवर्जून पहाणी
मा.आ.रवींद्रजी चव्हाण आज रत्नागिरी दौऱ्यावर असताना भर दुपारी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नूतन वास्तू निर्माणाचे ठिकाणी पोहोचले व प्लॅनसह बांधकामाची पहाणी केली.१९७ वर्षाचे हे महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय आहे. या वाचनालयाची नवीन वास्तू सर्वोत्तम झाली पाहिजे यासाठी वाचनालयाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी दिवशी बांधकामाचा शुभारंभ झाला आहे आणि आज ३ महिन्यात बांधकाम स्लॅब लेवल पर्यंत पोचले आहे हा वेग खूप बोलका आहे. दि.१४ जानेवारी २०२७ रोजी द्वीशताब्दी वर्षात वाचनालय प्रवेश करत आहे. त्या तारखेपर्यंत हे वाचनालय सुसज्ज करण्यासाठी सगळे मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे नवनिर्माण कार्य पूर्णत्वाला नेऊया असे सांगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहाचे काम उत्तम पद्धतीने करूया.
ऐतिहासिक वाचनालय आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व या दोघांना साजेसे सभागृह उभे करण्यासाठी लागेल ती मदत करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही असं सांगत ॲड. दीपक पटवर्धन यांना मा.आ.रवींद्रजी चव्हाण साहेबांनी शुभेच्छा दिल्या व या कामात हाक माराल तेव्हा तुमच्याबरोबर असेन अशा भावोत्कट शब्दात आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.मा.आ.रवींद्रजी चव्हाण भा.ज.पा प्रदेश कार्याध्यक्ष यांनी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या वास्तू निर्माण कार्याची केली आवर्जून पहाणी मा.आ.रवींद्रजी चव्हाण आज रत्नागिरी दौऱ्यावर असताना भर दुपारी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नूतन वास्तू निर्माणाचे ठिकाणी पोहोचले व प्लॅनसह बांधकामाची पहाणी केली.१९७ वर्षाचे हे महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय आहे.
या वाचनालयाची नवीन वास्तू सर्वोत्तम झाली पाहिजे यासाठी वाचनालयाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी दिवशी बांधकामाचा शुभारंभ झाला आहे आणि आज ३ महिन्यात बांधकाम स्लॅब लेवल पर्यंत पोचले आहे हा वेग खूप बोलका आहे. दि.१४ जानेवारी २०२७ रोजी द्वीशताब्दी वर्षात वाचनालय प्रवेश करत आहे. त्या तारखेपर्यंत हे वाचनालय सुसज्ज करण्यासाठी सगळे मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे नवनिर्माण कार्य पूर्णत्वाला नेऊया असे सांगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहाचे काम उत्तम पद्धतीने करूया. ऐतिहासिक वाचनालय आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व या दोघांना साजेसे सभागृह उभे करण्यासाठी लागेल ती मदत करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही असं सांगत ॲड. दीपक पटवर्धन यांना मा.आ.रवींद्रजी चव्हाण साहेबांनी शुभेच्छा दिल्या व या कामात हाक माराल तेव्हा तुमच्याबरोबर असेन अशा भावोत्कट शब्दात आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.