
प्राथमिक शिक्षक समिती कोकण विभाग मार्फत दापोलीत शिक्षण परिषद व भव्य मेळाव्याचे आयोजन
आगरवायंगणी: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती- कोकण विभागाचे वतीने दापोली येथील सेवावृत्ती शिंदे गुरुजी सभागृह येथे विजय कोंबे, राज्याध्यक्ष शिक्षक समिती यांचे अध्यक्षतेत कोकण विभाग शिक्षण परिषद व भव्य मेळावा दि.१३ एप्रील रोजी संपन्न होणार असून, सदर परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे हस्ते होणार असल्याचे; तर ज्ञानेश्वर म्हात्रे,शिक्षक आमदार व उदय शिंदे शिक्षक नेते, राज्य सर चिटणीस राजन कोरगावकर,विजयकुमार पंडित राज्य सल्लागार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याचे स्वागताध्यक्ष तथा कोकण विभाग अध्यक्ष अंकुश गोफणे यांनी सांगितले.
सदर परिषदेत १५ मार्च २०२४ संच मान्यता निर्णय रद्द करणे, कोकण विभागासाठी विशेष डोंगरी निकष लागू करणे, जूनी पेन्शन लागू करणे,शिक्षण सेवक पद रद्द करणे, अशैक्षणिक कामातून शिक्षण क्षेत्राला मुक्त करणे, ऑनलाईन कामासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करणे, प्रस्तावित विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४ रद्द करणे आणि रिक्त प्रशासकिय पदे पदोन्नतीने भरणे आदि. प्रमुख मागण्या असणार आहेत. मेळावा उत्तम प्रकारे पार पडावा यासाठी दिपक शिंदे जिल्हा अध्यक्ष, दिलीप महाडिक जिल्हा नेते, संतोष पावणे जिल्हा सचिव, सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी दिलीप मोहिते, शरद भोसले, सुनील दळवी, स्वप्नील परकाळे, नरेंद्र उकसकर, विजय क्षिरसागर, विठ्ठल कुठेकर, विश्र्वास भोपे, शशिकांत शेळके, अनिलकुमार मळगे, संजय माने, अरुण सोनवणे, गुलाब आहिरे, भरत शिद प्रयत्न करत आहेत.