
कोकणच्या मुलभूत प्रश्नांसाठी कोकण रोजगार हक्कासाठी महाआंदोलन
रत्नागिरी ः कोकणच्या मुलभूत प्रश्नांवर पहिले कोकण रोजगार हक्क महाआंदोलन होणार असून १७ जून रोजी त्याची सुरूवात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून कोकणातील बेरोजगारीसोबत मत्स्यविकास, आंबा आणि पर्यटन विकासासाठी शासनाकडून ठोस पावले उचलण्याची मागणी होणार आहे. यासाठी नियोजनाच्या बैठका पार पडत असून विविध उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
यापूर्वी रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे आंदोलन १७ जूनरोजी होणार असून या दिवशी दुपारी २ वा. हातखंबा ते जिल्हाधिकार कार्यालय अशी भव्य कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ४ वा. शहरातील मराठा मैदान येथे रत्नागिरी रोजगार हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.