
पोस्ट कोविड काउन्सिलींग व ट्रीटमेंट सेंटर’ सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला
कोरोना संसगार्तून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुस, यकृत व मूत्रपिंडांच्या तसेच मानसिक तणावाच्या तक्रारी उद्भवत असल्याने या आजारातून बरे होऊन बाहेर पडलेल्या प्रत्येकाला पुन्हा आपल्याला काही होणार तर नाही ना ही भीती आहे. ती दूर करण्यासाठी आता प्रत्येक जिल्हा रूग्णालयामध्ये व शहरी भागात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, ‘पोस्ट कोविड काउन्सिलींग व ट्रीटमेंट सेंटर’ सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची देखील व्यवस्था केली जाणार आहे
www.konkantoday.com