
राजापूर समर्थ नगर (भटाळी) रस्त्याची आमदार किरण सामंत यांच्याकडून पहाणी.
राजापूर : शहरातील समर्थनगर (भटाळी) येथील रस्त्याच्या कामाची सोमवारी आमदार किरण सामंत यांनी पहाणी केली. शहरात अशा प्रकारे रस्त्यांचे रूंदीकरण होऊन शहरवासीयांना चांगली सेवा मिळणार असेल तर यापुढेही अशा रस्त्यांच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही यावेळी आ. सामंत यांनी दिली.आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याने शहरातील समर्थनगर (भटाळी) येथील रस्त्याच्या कामासाठी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी नगरोत्थान योजनेंतर्गत तिस लाखाचा निधी मंजूर केला आहे.
या योजनेंतर्गत या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता रूंदीकरण, खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा यात समावेश आहे.या रस्त्याच्या कामाची आ. सामंत यांनी सोमवारी प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. शहरातील एका मुख्य वस्तीतील रस्ता अशा प्रकारे चांगला होत असून शहरात भविष्यातही अशा प्रकारे चांगले रस्ते करण्यासाठी आपण प्रयत्न करू व त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करू अशी ग्वाही यावेळी आ. सामंत यांनी दिली.याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले, भाजपा जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, जिल्हा बँक संचालक महेश उर्फ मुन्ना खामकर, राजापूर अर्बन बँकेचे संचालक संजय ओगले, एड. यशवंत कावतकर, प्रसन्न मालपेकर, माजी नगरसेवक गोविंद चव्हाण, दीलीप चव्हाण, स्थानिक नागरीक डॉ. अरूण जोशी, डॉ. सुयोग परांजपे, डॉ. अभय अळवणी, दीलीप गोखले, रमेश गुणे, संतोष पेडणेकर, नगर परिषदेचे कार्यालयिन अधिक्षक जितेंद्र जाधव, अभियंता रणविर कोकरे देसाई, योगेश बंडगर, ठेकेदार डी. एम. चव्हाण आदी उपस्थित होते.याप्रसंगी आ. सामंत यांनी स्थानिकांशी चर्चा करून त्यांचेही म्हणने ऐकून घेतले. यावेळी आमदार सामंत यांनी या कामाबाबत समाधान व्यक्त करताना आवश्यक ती व कामे करण्याबाबत न. प. प्रशासन व ठेकेदाराला सुचना दिल्या.