
नाचणे रोड ते गुरुमळी जाणाऱ्या रोडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची “अंमली पदार्थ विरोधी कारवाई ब्राउन हॅरॉईन सदृश्य अमली पदार्थ विक्री करण्याकरिता आलेल्या एका इसमास पकडले.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने धडक कारवाई करणेबाबत मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार हे रत्नागिरी शहरात दि. ०७/०४/२०२५ रोजी गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे नाचणे रोड ते गुरुमळी जाणाऱ्या रोडवर आडोशाला संशयीत आरोपीत अदनान नाजीममियाँ नाखवा, वय २५ वर्षे, रा. १५७, ब, जुना फणसोप, ता. जि. रत्नागिरी हा आपले दुचाकी वाहनावर बसून संशयीत हालचाली करीत असताना दिसून आला म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने त्याची चौकशी करून त्याचे ताब्यातील पिशवी पंचांच्या समक्ष तपासून खात्री केली असता त्यामध्ये ब्राउन हॅरॉईन ह्या अमली पदार्थाच्या एकूण १५४ पुड्या व इतर साहित्य मिळून आले म्हणून त्यास ताब्यात घेण्यात आले. तसेच आरोपीत अदनान नाजीममियाँ नाखवा, याचे विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १३३/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी अदनान नाजीममियाँ नाखवा, वय २५ वर्षे, रा. १५७, ब, जुना फणसोप, ता. जि. रत्नागिरी याच्या कडून ब्राउन हॅरॉईन सदृश्य अमली पदार्थाच्या १५४ पुड्या व ०१ दुचाकी वाहन असा मिळून एकूण २,०५,०००/- रू किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे.ही, कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक श्री. नितीन ढेरे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ, पो.हवा/251 शांताराम झोरे, पो.हवा/477 नितीन डोमणे, पो.हवा/305 बाळू पालकर व पो.हवा/306 गणेश सावंत यांनी केलेली आहे.