
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या पेट्यांची अक्षरशः बंपर आवक.
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या पेट्यांची अक्षरशः बंपर आवक झाली आहे. तब्बल एक लाख हापूस आंब्याच्या पेट्या आज बाजारात दाखल झाल्यामुळे आंब्याच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. नवी मुंबईच्या बाजारात आलेल्या 80 हजार पेट्या थेट कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागातून आल्या आहेत. तर उर्वरित 20 हजार पेट्या कर्नाटक आणि केरळ राज्यांसारख्या परराज्यातून दाखल झाल्या आहेत.
परराज्यातील हापूस सध्या 60 ते 120 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.आता कोकणातील हापूसबद्दल बोलायचं झाल्यास, चार डझन पेटीचा दर आता 1500 ते 3500 रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे ज्या हापूसची चव घेण्यासाठी आत्तापर्यंत जास्त पैसे मोजावे लागत होते, तो आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.