
चिपळूण येथे तीन ठिकाणी रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरतर्फे आशा सेविकांना केले मार्गदर्शन.
रत्नागिरी : प्रतिनिधी वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालयातील रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून चिपळूण येथे नुकतेच आशा सेविकांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चिपळूण येथे २४ मार्च रोजी आशा सेविकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या शिबिरामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. निरजा यादव, डॉ. दीपाली पांडे यांच्यासह एलएचव्ही आय. डी. पड्यार, सीएचओ विद्या जाधव, गटप्रवर्तक पूजा सकपाळ उपस्थित होत्या.
फुरुस आरोग्य केंद्रात झालेल्या शिबिरामध्ये आशा सेविकांसह वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रांजल बेलवलकर, एलएचव्ही आकांक्षा कोळवणकर, गटप्रवर्तक संदीपा सावंत उपस्थित होते तर नगर पालिका केंद्र चिपळूण येथे झालेल्या मार्गदर्शन शिबिरामध्ये केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ स्वरूपा गरुड, गट प्रवर्तक सुनीला जाबरे उपस्थित होते. तर रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरकडून श्वेता कदम, सायली चव्हाण आणि अनुष्का होरंबे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या शिबिरांमध्ये आशा सेविका यांना आरोग्य क्षेत्रातील नवनवीन बदलाबाबत, आधुनिक उपचार पद्धतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले होते. या शिबिराचा उपयोग झाल्याचे आशा सेविकांकडून सांगण्यात आले.