
चक्कर येऊन पडल्याने एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा येथील रेमंड कंपनीसमोरील रोडवर चक्कर येऊन पडल्याने एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. सुरेश महादेव देवरुखकर (वय ५०, सध्या महापुरुष मंदिरजवळ, मुरुगवाडा, रत्नागिरी, मूळ रा. गोवळ बुरंबेवाडी, ता. राजापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश देवरुखकर हे ०७ एप्रिल रोजी सकाळी ७:०० वाजताच्या सुमारास कामासाठी जात होते. त्यावेळी मुरुगवाडा येथे रेमंड कंपनीसमोरील रोडवर त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली पडले. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी त्यांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. त्यांना उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.