
कोकणात फक्त एक पाऊल टाकणार नाही, तर संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार. बघू, कोण मध्ये येतय- उद्धव ठाकरेंनी दिला इशारा
कोकणातील काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी उद्धव ठाकरे गटात आज प्रवेश केला. मातोश्रीवर सहदेव बेटकर यांना उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलं. यावेळी संजय राऊत म्हणाले की, “आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसैनिक आहात.
सहदेवाच्या येण्याने नवीन कुरुक्षेत्रावर महायुद्ध सुरु झालेलं आहे. हे कोकणातलं युद्ध आपण जिंकणारच आहोत” “अनेकांनी सहदेवाना सांगितलय हे शेवटचं मैदान, आता मैदान बदलायचं नाही. आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा संपूर्ण भगवा करुन ते ठेकेदारांच राज्य संपवून टाका. मी उद्धव ठाकरेंना इतकच सांगेन कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र कोकणातील एक कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी किती कार्यकर्ते आलेत. शिवसैनिक आलेत. सगळं जागेवर आहे, बाहेर फक्त हवा आहे. बाहेरच्या हवेची दिशा बदलताना मला दिसतेय, आपण फक्त कोकणात एक दौरा करा. आपण कोकणच्या भूमीवर एक पाऊल ठेवा, पहा कशी दाणादाण उडते” असं संजय राऊत म्हणाले. ‘एक गद्दार राहणार नाही औषधाला. कोकणात खूप लढाया केल्या आहेत’ असं संजय राऊत म्हणाले.
“मातोश्री माझी 92 सालापासून आहे. 92 ला मोठ्या साहेबांच दर्शन घेतलेलं. रमेश मोरेंच्या आशिर्वादाने मी मातोश्रीवर आलेलो. आज मी परत माझ्या घरात आलेलो आहे” असं सहदेव बेटकर म्हणाले. “सहदेव एवढया जोरात बोलला की, हा आवाज तळ कोकणापर्यं गेला असेल. मला आणखी काही बोलण्याची आवश्यकच वाटत नाही. दत्ता आज तुमचा वाढदिवस आहे, तुमचं खरच कौतुक आहे, स्वत:चा वाढदिवस असताना शिवसेना वाढवण्यासाठी इथे आलात. दत्तासारखे अनेक शिवसैनिक आज राज्यभर पसरले आहेत. त्यांनी आतापर्यंत शिवसेना वाढवली, शिवसेना वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करतायत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.संजय तुम्ही म्हणालात कोकणात एक पाऊल टाका, मी कोकणात फक्त एक पाऊल टाकणार नाही, तर संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार. बघू, कोण मध्ये येतय. लोकसभा काय, विधानसभा काय कोकणातला निकाल सर्वांना अनपेक्षित होता. कोणी, कसा विजय मिळवला त्याच्या सूरस कथा बाहेर येत आहेत. ज्यांनी थापा मारल्या ते आता हात वर करुन मोकळे झालेत. शिवसेनेची गरज राज्यातील जनतेला आहे. दिलेल्या शब्दाला जागणारा एकमेव पक्ष आहे, तो म्हणजे शिवसेना” असं उद्धव ठाकरे म्हणाले.