रत्नागिरी शहरात पोलीस असल्याची बतावणी करत महिलेच्या गळ्यातील दागिने लांबवले.

रत्नागिरी शहरातील 80 फूटी हायवे येथे वृध्देला पोलिस असल्याची बतावणी करत तिच्या कानातील 14 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 60 हजार रुपये किमतीचे कानातले व साखळ्या दोन अज्ञातांनी लांबवल्या.ही घटना मंगळवार 8 एप्रिल रोजी दुपारी 2.15 वा.सुमारास घडली.रशिदा रशिद साखरकर (70, मुळ रा. राजापूर नाणार इंगलवाडी सध्या रा.पेठकिल्ला,रत्नागिरी) असे तक्रारदार वृध्द महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी रशिदा साखकर या पेठकिल्ला येथील आपल्या घरातून मांडवी येथे आपल्या नातेवाईकांकडे औषध आणण्यासाठी जात होत्या.

त्या 80 फूटी आयवे येथील भूते नाक्याजवळ आल्या असता दोन अज्ञात पांढर्‍या रंगाच्या दुचाकीवरुन तिथे आले. त्यांनी रशिदा साखरकर यांना आपण पोलिस असल्याची बतावणी करत पुढे चोरी झाली आहे. एका तरुणाच्या गळ्यातील चेन चोरीला गेली असल्यामुळे तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने काढून आमच्याकडील कागदामध्ये टाका असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून साखरकर यांनी आपल्या अंगावरील खोट्या दागिन्यांसह सोन्याचे खरे दागिनेही त्या कागदामध्ये ठेवले. त्यानंतर संशयितांनी हातचलाखी करत दुसर्‍याच कागदाची पुडी त्यांच्या हातात देउन तेथून पोबारा केला.दरम्यान, रशिदा साखरकर यांनी घरी गेल्यानंतर ती पुडी उघडून पाहिली असता त्यांना त्यामध्ये प्लास्टिकच्या बांगड्या आणि दगड दिसून आले. आपली फसवण्ाूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या मुलाला फोन करुन सर्व हकिकत सांगितली. त्याने आईसह शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटिव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. याबाबत आरोपींचा शोध सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button