
ममता बॅनर्जींची तुलना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याशी केल्याने धनगर समाजात संतापाची लाट
पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचं कौतुक करताना सामना अग्रलेखाचे संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून चांगलाच वाद पेटला आहे. राऊत यांनी ममता बॅनर्जींची तुलना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याशी केल्याने धनगर समाजात संतापाची लाट पसरली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचा समाजातून निषेध करण्यात येत आहे.
आता या संतापाची दखल घेऊन अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.पत्रात म्हटलंय की, आपल्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा आपल्या मुखपत्रातील लेख वाचला. ज्यापद्धतीने लेख लिहिला आहे. त्यावरून त्यांची वैचारिक पातळी लक्षात येते. आपण पक्ष, राजकारण म्हणून खुशाल एकमेकांवर चिखलफेक करा पण त्यामध्ये आपण जर राष्ट्र पुरुषांची नावे वापरून त्यांची तुलना जर आजच्या नेते मंडळींशी करत असाल तर हे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे
www.konkantoday.com