
अमली पदार्थविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांची जिल्ह्यात जनजागृती मोहीम
अमली पदार्थविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांनी जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबवली आहे. यावर्षी ‘युवा पिढी आणि अमली पदार्थ’ असे शीर्षक देण्यात आले होते. या जनजागृती माेहिमेंतर्गत रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरीतील सर्व नागरिकांना अमली पदार्थ दिवसाचे महत्त्व आणि मादक द्रव्यापासून होणारी हानी व घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. अमली पदार्थांविषयी कोणाला काही माहिती मिळाली तर त्यांनी ती पोलिसांना द्यावी. ही माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
www.konkantoday.com