बलात्कार प्रकरणी जैन मुनी शांतीसागर महाराजांना 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, सुरत न्यायालयाचा निर्णय!

: बलात्कार प्रकरणी दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयानं सुनावली आहे. 19 वर्षी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ह शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरत सत्र न्यायालयाने याबाबत त्यांना दोषी ठरवलं आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज यांनी 2017 मध्ये, एका 19 वर्षांच्या श्राविका (महिला जैन भक्त) हिच्यावर बलात्कार केला होता. शुक्रवारी त्यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. आज त्यांची शिक्षा जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये शांतीसागर यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2017 मध्ये, जैन मुनी सुरतमधील नानपूर येथील उपाश्रयात राहत होते. म्हणूनच मूळ मध्य प्रदेशातील 19 वर्षांची मुलगी आणि तिचे कुटुंब, जे त्यांना आपले गुरु मानत होते, त्यांची शांतीसागरवर खूप श्रद्धा होती.

शांतीसागर यांनी त्यांना पूजाविधीच्या बहाण्याने सुरत आश्रमात बोलावले होते. रात्री कुटुंब आश्रयस्थानात राहिले. यावेळी, रात्री 9.30 च्या सुमारास, शांतीसागर यांनी मुलीला पूजेचे निमित्त करून त्यांच्या खोलीत बोलावले आणि कुटुंबातील सदस्यांना खोलीबाहेर उभे राहण्यास सांगितले. यावेळी, पूजेचे बहाण्याने धमकी देऊन मुलीवर बलात्कार करण्यात आला.सुरुवातीला कुटुंबाने आपला सामाजिक आदर गमावू नये म्हणून गप्प बसले, परंतु नंतर, इतर मुलींसोबत असे घडू नये असे वाटून, कुटुंबाने घटनेच्या 13 दिवसांनी सुरतमधील अथवलाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून जैन मुनी शांतीसागर यांना अटक केली.

पीडितेने तिच्या तक्रारीत असाही आरोप केला आहे की घटनेच्या काही दिवस आधी जैन मुनींनी तिच्याशी फोनवर बोलले होते आणि पूजाविधीसाठी पीडितेचा नग्न फोटोही मागितला होता. ते म्हणायचे की पूजेसाठी असे चित्र आवश्यक आहे. बलात्काराच्या आरोपानंतर, शांतीसागर यांना सुरतच्या अथवलाइन्स पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून ते सतत सुरतमधील लाजपोर तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होते. आरोपपत्र सादर झाल्यापासून सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

सुरतचे सरकारी वकील नयन सुखाडावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पक्षाने 33 साक्षीदार हजर केले. वैद्यकीय तपासणी आणि फॉरेन्सिक अहवालासह सर्व कागदोपत्री पुरावे सादर करून आरोप यशस्वीरित्या सिद्ध करण्यात आले. आज सुरत सत्र न्यायालयाने आरोपी जैन मुनी शांतीसागर यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे आणि 25000 रुपये दंडही ठोठावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button