
पालकमंत्री उदय सामंत यांनीकोकणची समृद्ध कला परंपरा जपणारा कोकणचा साज, संगमेश्वरी बाज” या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी श्रीराम नवमी निमित्त मानसकोंड, संगमेश्वर येथील श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या.
या शुभ प्रसंगी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी कोकणची समृद्ध कला परंपरा जपणारा “कोकणचा साज, संगमेश्वरी बाज” या विशेष कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी बोलताना, पारंपरिक वाद्यांची साथ आणि कलाकारांचा बहारदार जलवा, मनामध्ये भक्तीभाव अधिकच वृद्धिंगत करणारा ठरला, असे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
या कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख बाबू म्हाप, शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांच्यासह मोठ्या संख्येने संगमेश्वरकरांची उपस्थिती लाभली.