
जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रलंबित अर्ज मार्गी लावा – जिल्हाधिकारी
रत्नागिरी, दि.7 : ज्या विभागाकडे प्रलंबित अर्ज आहेत, ते तात्काळ मार्गी लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर आदी उपस्थित होते.
मागील प्रलंबित अर्जांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी म्हणाले, 100 दिवस आराखडा अंतर्गत प्राधान्याने प्रलंबित अर्ज 17 एप्रिल पर्यंत मार्गी लावणे आवश्यक आहे. आज नव्याने 3 अर्ज दाखल झाले आहेत. संबंधित विभागाने मागील प्रलंबित अर्जांसह याची निर्गती करावी.