
लातूर महानगरपालिकेचे आयुक्ताने स्वतःवर गोळी मारून आत्महत्येचा केला प्रयत्न.
लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली, यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी (5 एप्रिल) रात्री उशिरा घडलेलेल्या घटनेनं लातूर शहर हादरलं आहे.




