
रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण असूनही एमएचटी, सीईटी परीक्षेचे केंद्र रत्नागिरीत नाही.
एमएचटी, सीईटी ही महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमांसाठीची राज्यस्तरीय परीक्षा आहे. मात्र, या परीक्षांसाठीरत्नागिरी जिल्ह्यात केवळ दाेन केंद्र असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांची फरपट हाेत आहे.विशेष म्हणजे या परीक्षांसाठी केंद्र मिळण्याबाबत रत्नागिरीतील फिनाेलेक्स अकॅडमीने प्रस्ताव पाठविला आहे.
पण, या प्रस्तावाला मंजुरी न दिल्याने हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण असूनही एमएचटी, सीईटी परीक्षेचे केंद्र देण्यात आलेले नाही. जिल्ह्यात केवळ दाेन ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आल्याने रत्नागिरीसह अन्य सहा तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अन्य तालुक्यात जावे लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय हाेते.रत्नागिरी येथे परीक्षा केंद्र झाल्यास विद्यार्थ्यांची फरपट थांबेल.