
रत्नागिरी जयस्तंभ परिसरात एल सी बी ने पकडला 77हजार 500रुपयाचा ब्राऊन शुगर सदृश पदार्थ ,आरोपी ताब्यात.
आज रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी रामनवमी उत्सवाच्या अनुषंगाने शहरात पेट्रोलिंग करत असतानाजयस्तंभ येथील खाना खजना हॉटेल ठिकाणी एक इसम एका दुचाकी वाहनावर संशयित हालचाली करीत असताना दिसून आला.त्याचा संशय आल्याने व त्याच्याकडे असलेल्या पिशवी मध्ये कोणतातरी अंमली पदार्थ असण्याची शक्यता असल्याने सदर त्याच्या ताब्यातील पिशवीची खात्री करण्याकरिता दोन पंचांना समक्ष बोलावून चौकशी पोलिसांनी केली तेव्हा त्याच्याकडे असलेल्या पिशवी मध्ये ब्राऊन हिरोईन सदृश्य अंमली पदार्थ च्या पुड्या मिळून आल्या त्याचे वजन करता 0.4 मिली ग्रॅम वजनाचा ब्राऊन हिरोईन सदृश्य अंमली पदार्थ मिळून आला.
आरोपी आदिल अश्रफ शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 77,500/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाई पथकामध्ये एपीआय श्री वाघ पो हेड कॉ झोरे पोहेकॉ पालकर पोहेडकॉ सावंतपोहेकॉ पाटील हे सहभागी होते