
उद्धव ठाकरे यांच्या एका आदेशामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने
ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका आदेशामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आला आहे. उद्धव ठाकरे आदेशानुसार ठाकरे गटातील पदाधिकारी आपापल्या भागातील धनुष्यबाण काढायच्या कामाला लागले आहेत.प्रभादेवी येथे यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या राडा झाल्याचे समोर आलं आहे.ठाकरे गटाकडून प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या बाजूला एका लोखंडी बोर्डाच्या बाजूच धनुष्यबाणाचे चिन्ह काढत असताना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने मारल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांच्या विरोधात दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या निधीतून हे लोखंडी पोस्टर लावला असल्याचं शिंदे गटाचे म्हणणं आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हा खोडसाळपणा केला असल्याचं शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.मुंबई आणि पुणे येथे झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्याला भागात जिथे जिथे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आहे ते काढा आणि मशाल लावा, असे आदेश दिले होते. उद्धव ठाकरे यांचा आदेश शब्दश: घेत त्यानुसार ठाकरे गटाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत.