दुग्ध उत्पादनात कोकण अग्रस्थानी नेणार-वाशिष्ठी मिल्क अँण्ड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमेटेडचे अध्यक्ष प्रशांत यादव

दुग्ध उत्पादनाच्या चळवळीत कोकण राज्यात पहिल्या क्रमांवर नेण्याचा संकल्प आहे. वाशिष्ठी डेअरीच्या रूपाने रत्नागिरी जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर उभ्या राहिलेल्या दूध उत्पादनाच्या चळवळीत मंडणगड तालुक्याने अतिशय महत्वपूर्ण योगदान दिले आहे, असे प्रतिपादन वाशिष्ठी मिल्क अँण्ड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमेटेडचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले.वाशिष्ठ मिल्क अँण्ड मिल्क प्रॉडक्ट व क्रीमसन सॉईल अँग्रो यांच्यावतीने ४ एप्रिल रोजी तिडे येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यादव म्हणाले, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन यशस्वी झाल्यानंतर प्रगतीच्या पुढच्या टप्प्यात मंडणगड तालुक्याची भूमिका आणखीनच महत्वाची राहणार आहे.

दुग्ध उत्पादन व विक्रीचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी आणखीन जास्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी दुग्ध उत्पादक शेतकरी व नव्याने या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांच्या पाठीमागे कंपनी ठामपणे उभे आहे. दुधाचे वाढलेली उत्पादनाची गुणवत्ता, उत्पादन स्थिर ठेवण्यासाठी ओल्या चाऱ्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन पशुधनासाठी आवश्यक असलेला ओल्या चाऱ्याच्या निर्मितीचा पहिला प्रयोग मंडणगड तालुक्यात ओसाड २५ एकर क्षेत्रावर यशस्वी केला आहे. कोकणास दुग्ध उत्पादनात राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्याचा संकल्प असून, त्या दृष्टीने तरुण व नवयुवकांनी या व्यवसायाकडे वळावे, यासाठी शक्य ती सर्व मदत कंपनी करत आहे.

याचबरोबर दूध संकलन केंद्रावर चारा विक्री व शेतकऱ्यांची पशुधनाशी संबंधित वैद्यकीय अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र डॉक्टर नियुक्त करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगितले. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी, तिडे सरपंच मुमताज धनसे, कादीवलीचे सरपंच प्रमोद माने, उपसरपंच राजेश जाधव, नानू खैरे, संतोष राणे, निखिल दळवी, संकेत घोसाळकर, शिवाजी माने, विजय खैरे, मोहन दळवी, पाते व तालुक्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button