
जालगाव येथून सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी बाळकृष्ण शिगवण बेपत्ता झाल्याची तक्रार.
दापोली तालुक्यातील जालगाव येथून सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी बाळकृष्ण शिगवण (६३) बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी भाग्यश्री शिगवण यांनी दापोली पोलीस ठाणेत दिली.बाळकृष्ण शिगवण मुंबई कडे गेले येथे आपल्या मुलाकडे होते. तिथून ते दादर, भाईंदर येथून विरारला गणपती दर्शनाला गेले. तिथून भायखळा स्टेशनवर आले. तिथून ते बेपत्ता झाल्याचे भाग्यश्री शिगवण यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.