
रत्नागिरी जिल्ह्याला अतिवृष्टीचा दणका, जिल्ह्यात नुकसानीचा आकडा ७ कोटींच्यावर
रत्नागिरी ः यावर्षी रत्नागिरी जिल्हयाला अतिवृष्टीचा दणका बसला असून अनेक भागात रस्ता, पूल आदी सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. त्याशिवाय वैयक्तीक घरे, गोठे पडल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. चिपळूण जवळील तिवरे धरण फुटल्याने मोठा हाहाकार उडाला होता. आतापर्यंत अतीवष्टीमुळे अंदाजे ३०० घरे व ४० गोठ्यांचे नुकसान झाले असून नुकसानीचा आकडा सात कोटंींच्यावर गेला आहे. प्रशासनाकडून मदत करण्याचे काम सुरू असले तरी आतापर्यंत ८० लाखांच्या मदतीचे वाटप झाले आहे. यावर्षी अतिवृष्टीत बळी पडलेल्यांची संख्या २८ पर्यंत पोहोचली आहे. याशिवाय प्रशासनाने १५२ व्यक्तींचे स्थलांतर केले आहे.
www.konkantoday.com