
तिसरा मुलगा असता तर त्याला नारायण राणे यांनी सावंतवाडीतून उभं केलं असतं -सुषमा अंधारे.
आता शिवसेनेच्या फायबँड नेत्या सुषमा अंधारे या कोकणाच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांवर सडकून टीका केली आहे.राणेंचा गेम भाजपच करणार असल्याचं यावेळी अंधारे म्हणाले. कोकणात प्रचाराला आल्या असता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. शिवाय मुख्यमंत्रिपदाच्या नादात शिंदे आणि फडणवीस हे एकमेकांचेच गडी बाद करत आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
कोकणात सुषमा अंधारे या शिवसेना ठाकरे गटाचा प्रचार करणार आहेत. त्या आधी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला. राणेंनी आपल्या दोन मुलांना दोन मतदार संघातून निवडणुकीला उभं केलं आहे. ते स्वत: खासदार आहेत. त्यांना जर तिसरा मुलगा असता तर त्याला नारायण राणे यांनी सावंतवाडीतून उभं केलं असतं असा टोला अंधेरे यांनी लगावला आहे. त्यांना विकासाचा ध्यास आहे. त्यांना असं कोणतं पद मिळालं नाही, की ते विकास करू शकले नाहीत अशी विचारणाही त्यांनी या निमित्ताने केली.