उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला श्रीरामनवमीच्या शुभेच्छा

प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श घेऊन समाजात सौहार्दतेसह सहिष्णुतेची मूल्ये बळकट करूया – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 5 :- मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या आदर्शमय जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात सौहार्द, सहिष्णुता आणि सत्याची मूल्ये अधिक बळकट करण्याचे आवाहन करीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामनवमीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, “श्रीराम नवमी हा मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या जन्माचा उत्सव असून, हा दिवस त्यांच्या आदर्श जीवनमूल्यांची आठवण करून देतो.

श्रीरामांनी दाखवलेली प्रजाहितदक्षता, सत्यनिष्ठा आणि निःस्वार्थ सेवा ही आजही आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतात. त्यांच्या जीवनातून आपण एकता, शांती आणि समरसतेची शिकवण घेणे आवश्यक आहे. श्रीरामनवमीचा उत्सव सर्वांनी शांततेत, उत्साहात, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि सलोख्याने साजरा करावा,” असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार केले प्रभू श्रीरामांच्या चरणी वंदन केले आहे.—000—

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button