
अंबरनाथमध्ये चाललंय काय? तोंडाला मास्क लावून आले, तब्बल 16 वेळा तलवारीने सपासप वार. पहा सीसीटीव्ही फुटेज
अंबरनाथमध्ये शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या कार्यालयावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात कार्यालयाचे मोठे नुकसान झाले.तसेच कार्यालयात काम करणारा एक कर्मचारी जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. राजू महाडिक यांच्या कार्यालयात घुसणाऱ्या हल्लेखोरांनी तब्बल १६ वेळा तलवारीने वार केले.नेमकं प्रकरण काय?रोहित महाडिक यांचे अंबरनाथ पूर्वेकडील बी केबिन रोडवरील स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ कार्यालय आहे.
रात्री पावणे अकराच्या सुमारास अचानक तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी घेतलेले १० ते १२ हल्लेखोर त्यांच्या कार्यालयात घुसले. त्यांनी प्रथम तलवारीने कार्यालयाच्या काचा फोडल्या. यानंतर त्यांनी कार्यालयात प्रवेश करून एका कर्मचाऱ्यावर हल्ला केला. तसेच कार्यालयातील खुर्च्यांचीही तोडफोड केली.या संपूर्ण हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. अवघ्या २३ सेकंदात हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला.