
“शिवाजी पार्कला एक कॅफे उघडलाय, तिकडे चहा-पाण्याचे, पान-सुपारीचे.” उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊतांचा टोला!
महाराष्ट्रात मराठी बोलण्याचा मुद्द्यावरुन मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. महायुतीचे मंत्री, शिवसेना शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी आज पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्यात मराठीच्या मुद्द्यावरुन चर्चा झाली. इतर भाषेप्रमाणे आपल्या भाषेचा देखील व्हावा अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. यावर आमची देखील तीच भूमिका आहे, असे उदय सामंत म्हणाले. मराठीबाबत कोणी उलटसुलट केलं तर काय करायचं हे बैठकीत ठरवू असे उदय सामंत यांनी नमूद केलं. आता उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
*संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले.*शिवाजी पार्कला एक कॅफे उघडला*“उदय सामंत यांनी भेट घेतली हे चांगलं आहे. भेट घेऊ द्या त्यांच्याकडे शिवाजी पार्कला एक कॅफे उघडला आहे. चहा पाण्याचे कार्यक्रम, पान सुपारीचे कार्यक्रम होतात आणि वेगवेगळ्या विषयांवर होतात. असे सांस्कृतिक कार्यक्रम तिकडे शिवाजी पार्क व्हायला पाहिजे, नाहीतर तिकडे मराठीपण त्या भागातला नष्ट होईल”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.“उदय सामंत कोणाचे दूत असू शकत नाही. नाव मराठी भाषेचा असता, पडद्यामागे काय चालतं. ते आमच्याकडे येत असतं. महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजू नका.
शिवाजी पार्कमध्ये शिवतीर्थावर शिवसेनेचा जन्म झालेला आहे. त्यामुळे आमचे तिकडे माणसे आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.*आम्ही विरोधी पक्ष असल्यामुळे आमचा माईक बंद होता*“मला पवार साहेबांनी माहिती दिली. पवार साहेबांकडून माहिती घ्यायची वेळ असती तर पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खूपसून आपण गेला नसता. हे गृहस्थ व्यापारी आहेत, हे डरपोक आहेत, मला डरपोक लोकांशी बोलायचं नाही. त्यांचा माईक चालू होता आणि आम्ही विरोधी पक्ष असल्यामुळे आमचा माईक बंद होता, नाहीतर माझं उत्तर रेकॉर्ड वरती आलं असतं मी त्याला उत्तर दिला आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
हे म्हणत होते रंग बदलला, रंग कोणी बदलला आम्ही आमच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये ठामपणे उभे आहोत. पळून कोण गेलं, बापाच्या पाठीत खंजीर खुपसला. वेळ पडली तर माझ्या गाडीत डिकीत सगळं पडल आहे. माझ्या नादाला लागू नका शिवसेनेच्या नादाला लागू नका, गद्दार शिंदे गट आणि गद्दार राष्ट्रवादी गट यांनी देखील नादाला लागू नका. तुम्ही तिकडे सुखी आहात ना भांडी घासत आहात ना बूट पॉलिश करत आहात ना मग करत रहा. आमच्या स्वाभिमानाला डिवचन्याचा प्रयत्न करू नका. आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही दिल्लीत जाऊन कोणाची बूट चाटेगिरी करत नाही. आम्ही सत्तेचे भुके आणि हापापलेले नाही, असे संजय राऊत म्हणाले.