मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 18 एप्रिलपासून सुरू होणार- खासदार नारायण राणे.

परुळे-चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर येत्या 18 एप्रिलपासून एअर अलायन्सची मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई सेवा सुरू होणार आहे. एअर अलायन्सबरोबरच इंडिगो कंपनीची विमानसेवाही सिंधुदुर्गसाठी सुरू करण्याबाबत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती खा.नारायण राणे यांनी पत्रकाद्वारे दिली. अलीकडेच नागरी विमान वाहतूकमंत्री के. राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्यात येईल, असे माजी केंद्रीय मंत्री, खा. नारायण राणे यांना आश्वासीत केले होते. गेल्याच आठवड्यापासून याच विमानतळावरून सिंधुदुर्ग-पुणे ही ‘प्लाय-91’ची विमान सेवा सुरू झाली आहे.

खा. नारायण राणे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग विमानतळ कार्यान्वित झाल्यापासून नियमित सुरू असलेली मुंबई-सिंधुदुर्ग ही अलायन्स एअरलाईन्सची सेवा नियमित विमान सेवा बंद झाली होती.

ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे, यासाठी खा. नारायण राणे आग्रही होते. त्यांनी नागरी विमान वाहतूकमंत्री के. राम मोहन नायडू तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा किती महत्वाची आहे, तसेच विमानतळावरील अन्य सेवा, सुविधा, समस्या याकडे लक्ष वेधले होते. यानंतर वेगाने कार्यवाही होत सिंधुदुर्ग विमानतळावरील अनेक सेवा-सुविधा अपडेट करण्यात येत आहेत. यानुसार येत्या 18 एप्रिलपासून मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई ही एअर अलायन्सची विमान सेवा दर शुक्रवारी सुरु होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button