
मुंबई गोवा महामार्गावर तळेकांटे आणि कोळंबेनजीक बावनदीत भराव टाकून रस्ता, पर्यावरण प्रेमी मध्ये नाराजी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाने संगमेश्वरच्या दुतर्फा सध्या वेग घेतला आहे. संगमेश्वर येथील सोनवी पुलाची कामे मंद गतीने सुरू असली तरीही रस्त्याचे काम थांबलेले नाही. सध्या आरवली ते संगमेश्वरदरम्यान वेगाने काम सुरू असताना तळेकांटे आणि कोळंबेनजीक बावनदीत भराव टाकून रस्ता केला जात असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचा ऱ्हास असे विदारक दृश्य तळेकांटे ते कोळंबे या गावादरम्यान असणाऱ्या नदीत पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने जिल्हा प्रशासनासह संगमेश्वरच्या तहसीलदारांनी पाहणी करून याबाबत कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी जलदूत शहानवाज शहा यांनी केली आहे.