
डिपेक्स २०२५ : नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या भव्य प्रदर्शनाला ना. उदय सामंतांची भेट
आज पुणे येथील COEP मैदानावर आयोजित ३४व्या डिपेक्स प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी भेट दिली. या प्रदर्शनात ना. उदयजी सामंत ह्यांनी सर्व विद्यार्थ्यांची भेट घेतली.”विद्यार्थ्यांच्या मनात उद्योजकता निर्माण करण्याचे कार्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करत आहे, त्याबद्दल शासन म्हणून आम्ही आभारी आहोत,” अशी भावना यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केली.