
कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या तरुणाचा कुर्ला-मुंबई येथे रेल्वे अपघातात मृत्यू.
खेड तालुक्यातील होडखाड-वरचीवाडी येथील रहिवासी व सध्या कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या सुशांत गणपत शिगवण (३०) या तरुणाचा गुरुवारी रात्री कुर्ला-मुंबई येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. या तरुणाचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्याच्या अकाली निधनाने शिगवण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावरही शोककळा पसरली आहे.
होडखाड-वरचीवाडी येथे वास्तव्यास असलेल्या सुशांत शिगवण याचा डिसेंबरमध्ये तुंबाड येथील तरुणीशी विवाह झाला होता. नव्या संसाराची स्वप्ने रंगवत विवाह सोहळ्यानंतर कामानिमित्त मुंबईला गेला होता. कामावरुन परतत असताना त्याचे कुर्ला येथे अपघाती निधन झाले.