भावजयीने मित्राच्या मदतीने चोरले दिराच्या घरचे लाखो रुपयांचे दागिने

रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे गणपत रावजी नेवरेकर च्या घरातून लाखो रुपयांचे दागिने लांबवणाऱ्या चोरीचे गुढ पोलिसांनी उलगडले आहे. ही चोरी नेवरेकर यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या त्यांच्या भावजयीने आपल्या मित्रांच्या मदतीने केल्याचे उघड झाले आहे.या चोरी प्रकरणात पोलिसांनी विनया विनायक नेवरेकर व तिचा मित्र दीपक रघुनाथ आरेकर याला अटक केली आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे त्यांचेकडून एकतीसतोळे सोने व हजार रुपयाची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे ही चोरी पोलिसांच्या दृष्टीने एक आव्हान होते या चोरी प्रकरणात घराचे खिडकीचे गज काढून परत त्या ठिकाणी लावण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांना चोरी करणारा माहीतगार असावा असा संशय होत्या दृष्टीने त्यांनी तपास सुरू ठेवला होता. ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिताफीने तपास करून यातील आरोपींना अटक केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button