
अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणाचा ९ वर्षांनी निकाल; अभय कुरूंदकर दोषी
वसई/पनवेल- बहुचर्चित पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे अपहरण आणि हत्या प्रकरणात बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. महेश फळणीकर आणि कुंदनलाल भंडारी यांना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी जाहीर करण्यात आले. मात्र याप्रकरणातील दोन क्रमांकाचा आरोपी ज्ञानदेव उर्फ राजू पाटील याला पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील शुक्रवारी ११ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
९ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. याप्रकरणातील पोलिसांच्या भूमिका आणि कार्यपध्दतीवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.*अश्विनी बिंद्रे यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यांची २०१५ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र त्या कंळबोली पोलीस ठाण्यात रुजू झाल्याच नव्हत्या. दीड वर्षांपासून त्या बेपत्ता होत्या. अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी कळंबोली पोलीस ठाण्यात अभय कुरुंदकर यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी कुरुंदकर यांच्यावर कारवाई केली नव्हती. यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले होते. उच्च न्यायालयाने अश्विनी बिंद्रे यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
११ एप्रिल २०१६ रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचे उघड झाले होते. अनैतिक प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याचा तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी होता. अश्विनी बिंद्रे हिची हत्या करून आपल्या साथादीरांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या याप्रकरणा अभय कुरुंदकर, ज्ञानदेव पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना अटक करण्यात आली होती. अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह वसई खाडीत टाकण्यात होता. मात्र शेवटपर्यंत त्यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले नव्हते.*अभय कुरुंदकर दोषी असल्याचे निष्पन्न*पनवेल येथील सत्र न्यायालयाचे शनिवारी अंतिम सुनावणी झाली. यावेळी न्यायालयात आरोपी व सरकारी पक्षाच्या वकिलांसह मोठ्या प्रमाणात गर्दी हो. न्यायाधिश कृ. प. पालेदवार यांच्या यांच्यासमोर सरकारी वकिलांनी तब्बल ८० विविध व्यक्तींची साक्ष नोंदवली. त्यानंतर शनिवारी न्यायालयाने या हत्या प्रकरणाचा निर्णय जाहीर केला. बिंद्रे यांच्या हत्या प्रकरणात अभय कुरुंदकर याला न्यायालयाने हत्या आणि कट रचण तसेच बिद्रे यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याप्रकरणी दोषी जाहीर केले.
या प्रकरणातील क्रमांक २ चा आरोपी राजू उर्फ ज्ञानदेव पाटील याला दोष सिद्ध न झाल्याने दोष मुक्त करण्यात आल्याचे सुद्धा न्यायाधिशांनी सांगितले.या प्रकरणातील अन्य आरोपी महेश फळणीकर आणि कुंदनलाल भंडारी या दोन्ही आरोपींचा हत्येमधील सहभाग निष्पन्न झाला नाही. मात्र या दोन्ही आरोपींना हत्येमधील पुरावे नष्ट करण्यासाठी कुरुंदकर याला मदत केल्याचे दोषी सिद्ध झाल्याचे. ११ एप्रिल रोजी या प्रकरणी दोन्ही पक्षकारांना युक्तिवाद करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. या प्रकरणात सरकारी वकिल म्हणून प्रदीप घरत यांनी काम पाहीले. बचाव पक्षाचे वकिल म्हणून ॲड विशाल पाटील यांनी युक्तिवाद केला.संगिता अल्फान्सो यांनी या प्रकरणाचा तपास केला.*पोलिसांवर ताशेरे*न्यायालयाने याप्रकरणात पोलिसांच्या कार्यपध्दतीवर ताशेरे ओढले. संपूर्ण निकालाचे निरिक्षक नोंदवताना नवी मुंबई पोलिसांनी आश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्यापासून ते हत्येचा गुन्हा नोंदविण्यास केलेल्या टाळाटाळ, आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यास लावलेल्या दिरंगाईमुळे पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी कुरुंदकर यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्टेशन डायरीमध्ये नोंदवलेल्या चुकीच्या वेळेमुळे या प्रकरणात कुरुंदकरचा बनाव उघड झाला. करुंदकर याचे नाव राष्ट्रपदी पदकासाठी शिफारस करण्यात आले होते. तसेच पदोन्नतीच्या यादीतही त्याचे नाव होते. याबाबत न्यायालयाने संताप व्यक्त केला. या प्रकरणी सरकारी वकिलांतर्फे पोलिसांकडून झालेल्या हलगर्जीपणा केल्यामुळे खातेनिहाय चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.*
*अश्विनी बिद्रे पोलिस दलात २००५ साली रूजू झाल्या होत्या. सांगलीत पोस्टिंग असताना तिची अभय कुरुंदकरशी ओळख झाली होती. पुढे दोघांत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. अश्विनी व अभय कुरूंदकर हे दोघेही त्यापूर्वीच विवाहित होते व त्यांना पत्नीसह मुले होती. कुरूंदकरने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन बिद्रे यांच्यासोबत लग्न करण्याचे वचन दिले होते. त्यामुळे तिने पती राजू गोरे सोबतचे संबंध तोडले. अश्विनीला पती राजू गोरे पासून एक मुलगी आहे.. अश्विनीने अभय कुरूंदकरकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र, कुरूंदकरला अश्विनीशी लग्न करायचेच नव्हते. त्यावरुनच कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोजच भांडणे होत होती. मात्र कुरूंदकर पहिल्या पत्नीला व मुलांना सोडू शकत नव्हता तर बिद्रे यांनी लग्नाचा तगादा लावल्याने एकदाची कटकट संपवावी म्हणून त्यांची हत्या करण्याचा डाव रचला.यासाठी त्याने बालपणीचा मित्र महेश फळणीकर याला सोबत घेतले व अश्विनीची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिज मध्ये ठेवले होते. कुरूंदकरला याप्रकरणात राजू पाटील आणि कारचालक कुंदन भांडारी यांनी साथ दिली. महेश फळणीकर व राजू पाटीलच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे वसई खाडीत फेकून विल्हेवाट लावली. अश्विनी यांची हत्या केल्यानंतर त्या जिवंत आहेत, असे भासवण्यासाठी कुरूंदकरने अश्विनी यांच्या मोबाईलवरून मेहूणे अविनाश गंगापूरे यांना व्हॉट्सअपवर संदेश पाठवला होता. मानसिक अस्वास्थ्यामुळे आपण उपचार घेण्यासाठी ६ महिने उत्तरांचल किंवा हिमाचलला जाणार आहोत असे या संदेशात म्हटले होते.