दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा; संभाजी राजे छत्रपती आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत शासकीय मानवंदना

रायगड, – युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगडावर आज मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. संभाजी राजे छत्रपती आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय मानवंदना देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमले. शिवभक्तांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण व पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शिवभक्तांनी लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण शिवमय झालं असल्याचं पाहायला मिळाले.किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी झाली. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड , अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मोठ्या उत्साहात झालेल्या सोहळा कार्यक्रमासाठी या ठिकाणी कडक बंदोबस्तासह सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली. शिवप्रेमीसाठी मोफत बससेवा करण्यात आली होती. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती मार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या सोहळ्यानिमित्त विविध शासकीय विभाग व जिल्हा प्रशासनाने अन्नछत्र, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, सावलीसाठी मंडप, मोफत बससेवा आदी सुविधा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आल्या होत्या.जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह याप्रसंगी स्वतः उपस्थित राहून शिवराज्याभिषेक सोहळा 2024 निमित्ताने रायगडावर होळीचा माळ येथील कंट्रोल रूम, जगदीश्वर मंदिर, समाधी स्थळ व राजसदर येथे भेट देवून पाहणी केली व मार्गदर्शन केले . विशेष करून आरोग्य व्यवस्था व अन्नछत्राची पाहणी केली तसेच शिवप्रेमींची विचारपूस केली. रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वंदन करण्यासाठी आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button