
दाभोळ दापोली एसटीला ब्रेक निकामी झाल्याने अपघात चालकाचे प्रसंगावधान.
दापोली :- *गुरूवार दिनांक ०३ एप्रिल रोजी दाभोळ दापोली ही सकाळी पावणे इकराची बस वळणे येथे आली असता ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला.
चालक आर.बी.धोत्रे यांच्या ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येतीच प्रसंगावधान राखून चालकांनी गाडी नियंत्रणात आणण्यासाठी व मोठा अपघात टाळण्यासाठी एका एटारात नेली. गाडी रस्त्याच्या कडेच्या गटारात आदळल्याने प्रवासी भयभीत झाले आणि यातच सातजण जखमी झाले. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवावरचं जखमेवर निभावल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.सदरच्या गाडीमध्ये एकूण 21 प्रवासी होते .त्यामध्ये हरिश्चंद्र काष्टे वय वर्ष -72, तारामती काष्टे वय 68, रोशन मंगेश रोकडे वय 12, सायली मंगेश रोकडे वय 39, सुनंदा गोविंद रोकडे वय 70, हवाबी युसूफ बिजापूर वय 70, प्रेरणा सोलकर वय 20 या जखमी झाल्या आहेत यांच्यावर दापोली उपजिल्हारूग्णालयात उपचार करण्यात आले. अपघाताबाबत दापोली पोलीस अधिक तपास करित आहेत.