
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेतून तरुणीचे अवयवदान
सारोळेतील तरुणीचा आदर्शसंगमनेर, दि . ३ : तालुक्यातील सारोळे पराठा येथील वैष्णवी बाळासाहेब पोखरकर (वय २२वर्षे) हिचे नुकतेच निधन झाले. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून झालेले हे १४ व अवयवदान आहे. मरणोत्तर नेत्रदान जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानच्या माध्यमातून १ एप्रिल २०२५ रोजी नेत्रपेढी, प्रवरा ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, लोणी ता. राहाता. जि. अहिल्यानगर या ठिकाणी करण्यात आले.

याप्रसंगी तरुणीचे वडील बाळासाहेब विनायक पोखरकर, आई -अरुणा बाळासाहेब पोखरकर,आजी सिंधूबाई विनायक पोखरकर, आत्या प्रतिभा कैलास भागवत. आजी कलावती सोमनाथ सातपुते यांच्यासह तिच्या बहिणी, भाऊजी, भाऊ हे सर्वच नातेवाईक उपस्थित होते.अवघ्या तेवीसाव्या वर्षी बैष्णवीचे निधन झाले. मुलीच्या अकाली निघनाने पोखरकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तरीही जगदगुरुश्रींच्या सेवाकार्याने प्रेरणा घेऊन त्यांनी वैष्णवीचे नेत्रदान करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.