एस एस बी परीक्षेची पूर्व तयारी निःशुल्क प्रशिक्षणसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात २९ एप्रिल रोजी मुलाखत

रत्नागिरी, दि. 3 : महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठीच्या Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दिनांक ५ मे ते १४ मे कालावधीत SSB कोर्स क्र. ६१ आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणर्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्र.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.

मुलाखतीस येते वेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील SSB-61 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या)प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेवून यावे. तसेच अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी. : training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्र. आणि ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सअप क्र. ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे. यांनी केले आहे.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button