सिंधुदुर्गच्या समुद्रात गोव्यातील एलईडी नौकेला मच्छिमारी करताना पकडले.

महाराष्ट्र जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर ११ सागरी मैलावर अनधिकृतरित्या एलईडी मासेमिारी करणार्‍या गोवा राज्यातील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. पुढील कारवाई सुरू आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी मत्स्य खात्याचा पदभार घेतल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत अनधिकृत एलईडी लाईट नौकांवर कारवाईचा धडाकाच लावला आहे. मोठ्या प्रमाणात कारवाई मंत्री राणे यांच्या नेतृत्वात मत्स्य विभागाने केली आहे.

३० मार्च रोजी रात्री सिंधुदुर्ग मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी रवींद्र मालवणकर, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, दांडी मालवण समुद्रात नियमित गस्त घालत होते. यावेळी गोवा राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली नौका बलाका जेजू (नों. क्र. आयएनडी जीए ५ एमएम २३५१९) द्वार सज्यातील जलमयी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर ११ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या एलईडी लाईटद्वारे मासेमारी करत असताना दिसली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button