
सर्वात मोठे मच्छिमार बंदर असलेले मिरकरवाडा बंदर ना दुरूस्त नौकामुळे व कचर्यामुळे बनलेय बकाल.
एकीकडे शासनाने १०० दिवसात वेगवेगळे उपक्रम राबवून गतिमान प्रशासन करण्यावर भर दिला आहे. पण कोकण किनारपट्टीवर नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील अस्वच्छतेने या बंदर परिसराला गलिच्छ स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे.. तुटलेल्या नौकांचे सांगाडे, प्लास्टीकचा बंदराच्या भागात साचलेला खच, कचरा या सार्या गोष्टीमुळे येथील बकाल स्वरूप प्रकर्षाने समोर येत आहे.
या सार्या गलिच्छ परिसरामुळे मिरकरवाडा बंदरातील स्वच्छता केव्हा केली जाणार, असा प्रश्न नागरिक तसेच येथे येणार्या पर्यटकांमधूनही उपस्थित केला जात आहे. या बंदर विकासासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासन स्तरावरून धडक मोहीम राबवण्यात आली. बंदर विकासासाठी या परिसरातील अनधिकृत बांधकामे काढण्यात आली. मात्र चौथी जेटी गाळात बुडाली आहे. तिथे जुन्या मच्छीमारी नौकांचे सांगाडे गेले अनेक वर्षे तसेच खितपत पडले आहेत. या बोटी संबंधित नौका मालकांनी काढणे आवश्यक आहे. आज कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे बंदर म्हणून मिरकरवाडा ओळखले जात आहे.www.konkantoday.com