
संरक्षण मंत्रालयाने कर्नल कमांडंट ही मानद उपाधी कुलगुरू डॉ. संजय भावे यांना जाहीर केली.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भाव यांना संरक्षण मंत्रालयाने कर्नल कमांडंट ही मानद उपाधी जाहीर केली असून भारत सरकारच्या राजपत्रामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.कुलगुरू डॉ. संजय भावे यांचे शिक्षणही कोकण कृषि विद्यापीठामध्ये झालेले असून शिक्षण घेत असताना ते राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) चे ३ वर्षे छात्र (कॅडेट) होते तर त्यांनी १९७९ ते १९८२ या काळात सिनियर अंडर ऑफिसर म्हणूनही काम केले आहे.
कोकण कृषि विद्यापीठ दपोलीच्या सेवेत आल्यावर त्यांनी ७ वर्षे सहयोगी राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल संरक्षण मंत्रालयाने घेवून त्यांना कर्नल कमांडंट ही मानद उपाधी जाहीर केली आहे. एप्रिल महिन्यात एनसीसीचे मुंबई येथील अतिरिक्त महासंचालक, कोल्हापूर येथील ब्रिगेडीअर, तसेच बटालीयन कर्नल यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात कुलगुरू डॉ. संजय भावे यांना ही उपाधी प्रदान करण्यात येणार आहे.www.konkantoday.com