
फोनवर बोलण्याच्या नादात विहिरीत पडल्याने तरूणाचा मृत्यू
फोनवर बोलण्याच्या नादात विहिरीत पडून उत्तर प्रदेशमधील तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवार १८ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास जालगाव दापोली येथे घडली. राकेश बुच्चून भारद्वाज (३८, मूळ, रा. गोंडा उत्तरप्रदेश, सध्या रा. जालगाव दापोली) असे विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री तो राहत असलेल्या घराबाहेर फोनवर बोलत होता. तेव्हा खबर देणार यांनी त्याला जेवायला बोलावविण्यासाठी फोन केला. राकेशचा फोन न लागल्याने खबर देणार यांनी घराबाहेरच्या आवारात त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली असता राकेश जवळील विहिरीत पडलेला त्यांना दिसून आला. तेव्हा खबर देणार आणि त्यांच्या सहकार्यांनी राकेशला विहिरीतून काढून उपजिल्हा रूग्णालय दापोली येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी राकेशला तपासून मृत घोषित केले.www.konkantoday.com