
रत्नागिरी शहरातील रहाटाघर झोपडपट्टी येथे रमी खेळाच्या वादातून तरुणाला मारहाण.
रत्नागिरी शहरातील रहाटाघर झोपडपट्टी येथे रमी खेळताना झालेल्या वादातून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. मालू रामचंद्र पवार (४८, रा. रहाटाघर झोपडपट्टी, रत्नागिरी) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी मालू पवार यांनी रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अनिल पाटेकर (३२, रा. पेठकिल्ला रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. तक्रारदार मालू पवार, अनिल पाटेकर व अन्य दोघेजण ३० मार्च रोजी सकाळी रमी खेळत होते. सकाळी ८.३० च्या सुमारास मालू यांनी आपण विजयी झालो असल्याचे अनिल याला दाखविले. यातून झालेल्या वादातून अनिल याने मालू याला लाकडी दांडक्याने मारहाण केला, अशी नोंद शहर पोलिसात करण्यात आली आहे.www.konkantoday.com