
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा दिव्यांग क्रिकेट संघ कर्णधारपदी मंदार खैर यांची निवड.
खेड जिल्हा दिव्याग युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने २६ ते २७ एप्रिल या कालावधीत रत्नागिरी येथील सावंत स्पोर्टस् मैदानात महाराष्ट्रातील निमंत्रित जिल्हा कोकण चषक दिव्यांग खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धा पार पडणार आहेत. जिल्हा संघाच्या कर्णधारपदी मंदार खैर याची निवड करण्यात आल्याची माहिती दिव्यांग युवा प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सावंत यांनी दिली.
उपकर्णधारपदी एकनाथ जोशी, तसेच अल्पेश तावडे, दीपक खुटक, सागर आईनकर, भारत घेवडे, अमित डेरवणकर, सुफियान तांबे, मंगेश चांदडे, सचिन पवार, सिद्धेश तांमडकर, संजीव पोढकर, अमित फिलसे, अजिंक्य तांबे, राहूल बरे, आदर्श पवार, निलेश रावण व प्रशिक्षकपदी राजेश धारिया यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हयातील दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन मिळवून देण्याकरिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी निधी गोळा केला जात आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनार्दन पवार, पांडुरंग नाचरे, हर्षद चव्हाण, पल्लवी सावंत, रेणुका गोरीवले, प्रज्ञा जंगम, संतोष मालशे आदी प्रयत्नशील आहेत.www.konkantoday.com